रस्ता रोको आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्ता रोको आंदोलन
रस्ता रोको आंदोलन

रस्ता रोको आंदोलन

sakal_logo
By

00435
असळज ः येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रास्ता रोको आंदोलनानंतर उपविभागीय अभियंता बारटक्के यांना निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते.

असळज येथे राष्ट्रवादीचा रास्ता रोको
अर्धनग्न आंदोलन; गगनबावडा मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी

असळज, ता. १९ : कोल्हापूर-गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे पडल्याने मार्गाची अवस्था दयनीय झाली आहे. खड्ड्यातून मार्ग काढताना वाहनधारक त्रस्त झालेत. मात्र, राष्ट्रीय महामार्ग विभाग या रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष करत असल्याने याबाबत आज कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावर असळज येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी अर्धनग्न अवस्थेत रास्ता रोको आंदोलन केले. तसेच खड्ड्यांचे पूजन केले.
आज सकाळी सात वाजता रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचे पूजन करून नारळ वाढवून आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते अर्धनग्न अवस्थेत खड्ड्यात बसले होते. या आंदोलनामुळे कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची कोंडी झाली होती. गगनबावडा पोलिस ठाण्याचे सहा. पोलिस निरीक्षक रणजित पाटील यांनी यात मध्यस्ती करून तोडगा काढला. उपविभागीय अभियंता अर्धा तासात येतील तोपर्यंत आपण सहकार्य करून वाहतूक पूर्वपदावर सुरळीत करावी, अशी विनंती केल्यावर वाहतूक एका बाजूने सुरू करण्यात आली. साडेदहा वाजता उपविभागीय अभियंता पूजा बारटक्के आंदोलनस्थळी आल्या. त्यांनी १० दिवसांमध्ये मुरुमाने खड्डे बुजवण्यात येतील आणि पावसाळा संपल्यानंतर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. येत्या १० दिवसांत रस्त्याचे काम सुरू केले नाही, तर पुन्हा हेच आंदोलन तीव्र करण्यात येईल, असे सांगण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष जी. एस. कांबळे, तालुका कार्याध्यक्ष दिलीप पाटील, ओबीसी शहर अध्यक्ष कृष्णात चिले, सहकार सेल प्रमुख कृष्णात पाटील, युवा अध्यक्ष श्रीकांत कांबळे, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष शबीर नाचरे, विद्यार्थी सेल शिवाजी पाटील, किसन कांबळे, अमर पाटील, नझीर पाटणकर आदी सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Asj22b00240 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..