गगनबावडा एस.टी. आगाराच्या भोंगळ कारभाराचा विद्यार्थी व नोकरदार प्रवासी वर्गास फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गगनबावडा एस.टी. आगाराच्या भोंगळ कारभाराचा विद्यार्थी व नोकरदार प्रवासी वर्गास फटका
गगनबावडा एस.टी. आगाराच्या भोंगळ कारभाराचा विद्यार्थी व नोकरदार प्रवासी वर्गास फटका

गगनबावडा एस.टी. आगाराच्या भोंगळ कारभाराचा विद्यार्थी व नोकरदार प्रवासी वर्गास फटका

sakal_logo
By

00448
मणदूर : सकाळच्या पहिल्या एसटीत जागा मिळाली नसल्याने दुसऱ्या एसटीची वाट पाहत असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनी व नोकरदार. (छायाचित्र : पंडित सावंत)

विद्यार्थी, नोकरदार, प्रवाशांचे नुकसान
साळवणमार्गे गगनबावडा-नृसिंहवाडी दुसरी गाडी बंद केल्याचा परिणाम

पंडित सावंत : सकाळ वृत्तसेवा
असळज, ता. २६ : गगनबावडा एसटी आगाराच्या कारभाराचा फटका महाविद्यालयीन विद्यार्थी व नोकरदार वर्गास बसत आहे. सकाळच्या सत्रात गगनबावडा-नृसिंहवाडी या मार्गावर साळवणमार्गे दोन गाड्या जात होत्या; मात्र आता यातील एक गाडी धुंदवडेमार्गे सोडली जात आहे. साळवणमार्गे गगनबावडा-नृसिंहवाडी दुसरी गाडी बंद केल्याने प्रवाशांतून संताप व्यक्त होत असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
तालुक्यातून महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षणासाठी तिसंगी, कळे व कोल्हापूरला जातात. कोल्हापूरला जाणारा नोकरदार वर्ग, प्रवासी व महाविद्यालयीन विद्यार्थी सकाळच्या ७ च्या गगनबावडा-नृसिंहवाडी या गाडीने प्रवास करतात; मात्र प्रवाशांची संख्या जास्त असल्याने काही वेळा ही गाडी मांडुकलीदरम्यान पूर्णत: भरते. अशावेळी खोपडेवाडी, मार्गेवाडी व मणदूर येथील विद्यार्थी व प्रवासी वर्गास दुसऱ्या एसटीची वाट पाहत तिष्ठत बसावे लागते.
सकाळी ७ च्या पहिल्या एसटीत जास्त प्रवासी संख्या व रस्त्याची दुरवस्था यामुळे महाविद्यालय सुरू झाल्यानंतर ही गाडी तिसंगीत पोहचते. त्यामुळे ही गाडी सकाळी लवकर सोडणे गरजेचे आहे. ज्या विद्यार्थ्यांना ही एसटी मिळत नाही, त्यांना मुरुम गाडीची वाट पाहत बसावे लागते. मुरुम गाडीतून कॉलेजमध्ये जाण्यास जवळपास ९ वाजतात. महाविद्यालयाची वेळ सकाळी ७.३० वाजता असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांबरोबरच दररोज नोकरीनिमित्त कोल्हापूर येथे प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गास वेळेत पोहोचणे आवश्यक असते; मात्र वेळेत बस मिळत नसल्याने त्यांनाही फटका बसतो. सकाळच्या सत्रात साळवणमार्गे गगनबावडा-नृसिंहवाडी दुसरी गाडी पूर्ववत करावी तसेच रात्री ९.१५ मिनिटांनी रंकाळ्याहून गगनबावड्याला सुटणारी इचलकरंजी-गगनबावडा गाडी पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

कोट
आगारात गाड्यांची संख्या कमी आहे. धुंदवडे खोरीत गाडीच्या आवश्यकतेमुळे ही गाडी त्या मार्गे वळवली आहे. दोन्ही गाड्यांच्या वेळेचा मध्य साधून पहिली गाडी पंधरा मिनिटे उशिरा सोडत आहोत. गाडीची उपलब्धता होताच गाडी पूर्ववत सुरू करत आहोत.
-गणेश बुट्टे -प्रभारी आगारप्रमुख, गगनबावडा

Web Title: Todays Latest Marathi News Asj22b00247 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top