चौधरवाडी-म्हासुर्ली दरम्यानच्या पुलावर संरक्षण कठड्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चौधरवाडी-म्हासुर्ली दरम्यानच्या पुलावर संरक्षण कठड्याची मागणी
चौधरवाडी-म्हासुर्ली दरम्यानच्या पुलावर संरक्षण कठड्याची मागणी

चौधरवाडी-म्हासुर्ली दरम्यानच्या पुलावर संरक्षण कठड्याची मागणी

sakal_logo
By

00457
चौधरवाडी : चौधरवाडी-म्हासुर्ली दरम्यानच्या पुलावरून सरंक्षक कठड्यावरून धोकादायक वाहतूक सुरू आहे.

चौधरवाडी-म्हासुर्ली दरम्यानच्या
पुलावर संरक्षक कठड्याची मागणी

असळज, ता. २६ : धामणी नदीवर चौधरवाडी ते म्हासुर्ली दरम्यान राधानगरी व गगनबावडा तालुक्याला जोडणारा पूल आहे. या पुलाला संरक्षक कठडा नसल्याने दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पुलावर संरक्षण कठडा बांधण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे.
गगनबावडा व राधानगरी तालुक्यांना जोडणारा हा पूल वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्‍वाचा आहे. धामणी खोरीतील लोकांसाठी धुंदवडे व म्हासुर्ली या दोन मुख्य बाजारपेठा आहेत. त्यामुळे धामणी नदीवरील चौधरवाडी-म्हासुर्ली दरम्यानच्या या पुलावरून नागरिकांची सतत ये-जा सुरू असते. मात्र, या पुलाला संरक्षक कठडा नसल्यामुळे पुलावरून प्रवास करणे धोक्याचे बनले आहे. वाहन चालवताना थोडीशी चूक झाल्यास गाडी थेट पाण्याच्या प्रवाहात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून पुलावर संरक्षक कठड्याची व्यवस्था करावी, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Asj22b00251 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top