गगनबावडा तालुक्यात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गगनबावडा तालुक्यात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न.
गगनबावडा तालुक्यात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न.

गगनबावडा तालुक्यात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न.

sakal_logo
By

गगनबावडा
असळज : गगनबावडा तहसील कार्यालय येथे तहसीलदार संगमेश कोडे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. गगनबावडा पंचायत समितीत गटविकास अधिकारी माधुरी परीट यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. असळज येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्‍यामध्‍ये कारखान्‍याचे व्हा. चेअरमन बंडोपंत कोटकर यांच्‍या हस्‍ते, असळज ग्रामपंचायतीत सरपंच अनिता पळसंबेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन, मांडूकली ग्रामपंचायत येथे सरपंच दिपाली संदीप पाटील यांच्या हस्ते,केंद्रशाळा मांडुकली शाळेत व्‍यवस्‍थापन समितीचे अध्‍यक्ष पंडित सावंत यांच्‍या हस्‍ते, मांडुकली येथील यशवंत सोसायटी येथील ध्‍वजारोहण संस्‍थेचे चेअरमन सहदेव पाटील यांच्‍या हस्‍ते ध्वजवंदन रण्‍यात आले. गगनबावडा येथील परशुराम विद्यालयात निवृत्त शिक्षक आर. एस. साधले यांच्या हस्ते, ग्रामपंचायतीत सरपंच मानशी कांबळे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. गगनबावडा पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील, उपविभागीय कार्यालय महावितरणच्या वतीने सहाय्यक कार्यकारी अधिकारी जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
-
पन्हाळा
पन्हाळा ः सर्व शासकीय कार्यालयात ध्वजवंदन झाल्यानंतर शालेय विद्यार्थी आणि शासकीय कर्मचारी यांनी शहरातून घोषणांसह प्रभातफेरी काढली, विद्यार्थ्यांच्या हातातील फडकणाऱ्या तिरंग्यामुळे चैतन्य पसरले होते.येथील सदर इ महल तथा सज्जा कोठीवरील मुख्य ध्वजवंदन उपविभागीय अधिकारी अमित माळी यांच्या हस्ते झाले. यावेळी पन्हाळा विद्यामंदिर, कुमार विद्यामंदिर येथील विद्यार्थ्यांनी देशगीते गायली. पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या जिल्हा पोलीस दलाची सायकल रॅली येथे आल्यानंतर पन्हाळा पोलिस ठाणे व पन्हाळावासीयांनी त्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर ही सायकल रॅली शाहूवाडी पोलिस ठाण्याकडे रवाना झाली. पोलिस निरीक्षक अरविंद काळे, पोलिस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर, सहाय्यक फौजदार किशोर चौगुले, गोपनीय अंमलदार गणेश पाटील उपस्थित होते. रोटरी क्लब पन्हाळा च्या वतीने विद्या मंदिर सोमवार पेठ (आपटी) येथे विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. अध्यक्ष शशिकांत बच्चे, सौरभ पाटील ,ओमकार लोहार, रत्नाकर गायकवाड, प्रतापसिंह जाधव उपस्थित होते.
-
पोर्ले तर्फे ठाणे परिसर
पोर्ले तर्फे ठाणे: येथे ग्राम पंचायत आवारात सरपंच नम्रता घाटगे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.श्री दत्त दालमिया आसुर्ले पोर्ले साखर कारखान्यात कारखाना युनिट हेड एस.रंगाप्रसाद यांच्या हस्ते ध्वजवंदन करून न्यू इंग्लिश स्कूल पोर्ले, आनंदीबाई सरनोबत हायस्कूल आसुर्ले पोर्ले, श्री हनुमान हायस्कूल केर्ले येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा युनिट हेड एस रंगाप्रसाद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आसुर्ले येथे ग्रामपंचायतीच्या आवारात केडीसीसी बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. न्यु इंग्लिश स्कूल, आनंदीबाई सरनोबत हायस्कूल, एन. डी. चौगुले यांच्या कला वाणिज्य महाविद्यालय आसुर्ले पोर्ले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोर्ले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आसुर्ले, येथील विविध मान्यवरांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले व विद्यार्थ्यांना फळे व खाऊ वाटप करण्यात आला.तसेच पोर्ले येथे उदय दुध संस्थेच्या वतीने खिचडी वाटप करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Asj22b00284 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..