वीज अपघातास कारणीभूत झालेल्या दोघाविरोधात गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीज अपघातास कारणीभूत झालेल्या दोघाविरोधात गुन्हा
वीज अपघातास कारणीभूत झालेल्या दोघाविरोधात गुन्हा

वीज अपघातास कारणीभूत झालेल्या दोघाविरोधात गुन्हा

sakal_logo
By

वायरमनच्या अपघातास
कारणीभूत दोघांवर गुन्हा
कंत्राटी कर्मचाऱ्याला तिसंगीत विजेचा धक्का
असळज, ता. १९ : कंत्राटी वायरमन रवींद्र मार्गे याच्या अपघातास कारणीभूत तिसंगी वीज वितरण कार्यालयातील लाईनमन सलिम सुतार व वायरमन सतीश चौगले यांच्याविरोधात गगनबावडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याबाबतची फिर्याद जखमी कंत्राटी वायरमन रवींद्र मार्गे यांनी गगनबावडा पोलिसांत दिली आहे.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी : तिसंगी (ता. गगनबवडा) वीज वितरण कार्यालयातील कंत्राटी वायरमन रवींद्र विलास मार्गे हा तिसंगी ग्रामपंचायत नळ पाणीपुरवठा योजनेची बंद असणारी वीज सेवा सुरू करण्यासाठी टेकवाडी येथील डीपी दुरुस्तीसाठी वायरमन सतीश चौगले यांच्याबरोबर गेले होते. बिघाड झालेली डी.पी. दुरुस्तीसाठी वायरमन सतीश चौगले यांनी डीपीवर सुरू असणारा वीज पुरवठा बंद करण्यास लाईनमन सलिम सुतार यांना फोन करून सांगितले. संपर्कानुसार लाईनमन सलिम सुतार यांनी वायरमन चौगले यांना पुरवठा बंद केल्याचे फोनवरून सांगितले. पुरवठा बंद झाल्याचे चौगले यांनी सांगितल्यानंतर कंत्राटी वायरमन मार्गे डीपीवर चढले असता त्याच्या दोन्ही हातांना जोराचा धक्का लागून गंभीर जखमी होऊन खाली पडला.
कंत्राटी वायरमन मार्गे याला वीजपुरवठा बंद झाला नसल्याची खातरजमा न करता डीपीवर चढवून विजेचा धक्का लागून गंभीर जखमी होण्यास जबाबदार ठरल्याबद्दल लाईनमन सुतार व वायरमन चौगले यांच्याविरुद्ध फिर्यादी रवींद्र मार्गे याच्या जबाबावरून गगनबावडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तपास सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक मानसिंग सातपुते करीत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Asj22b00290 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..