टुडे २ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे २
टुडे २

टुडे २

sakal_logo
By

उद्योजक व नवउद्योजकांसाठी
तिसंगीत उद्या मार्गदर्शन

असळज, ता. २० : शासनाच्या विविध विभागांच्या उद्योग व व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या शासकीय योजनांची माहिती व त्याचा लाभ गगनबावडा तालुक्यातील नागरिकांना स्वरुपात व्हावा. या उद्देशाने ‘उद्योजक व नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम’ आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सोमवार (ता. २२) सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत तिसंगी (ता. गगनबावडा) येथील म. ह. शिंदे महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे. नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी/कर्मचारी, त्यांच्या विभागाचे माहिती पत्रक, सर्व योजनेचे कर्ज मागणी अर्ज, ऑनलाईन योजनेसाठी संबंधित तपशील व संपूर्ण माहिती घेऊन या सर्व योजनांचा लाभ घेतलेले यशस्वी उद्योजकांसह उपस्थित राहतील. शासनाचे विविध विभाग यात सहभागी होणार आहेत.
अर्जदारांनी जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, जन्म तारखेचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, बँक पासबुक इत्यादी कागदपत्रांची मूळ प्रत व एक झेरॉक्स प्रत घेऊन उपस्थित राहावे. विभागाचे अधिकारी त्यांच्या विभागांच्या योजनाबद्दल माहिती सविस्तरपणे देतील. माहिती पत्रक व कर्ज मागणी अर्ज उपलब्ध करून देतील तसेच आवश्यकतेनुसार त्याच ठिकाणी कर्ज प्रस्ताव दाखल करून घेतील किंवा उर्वरित कागदपत्राबद्दल मार्गदर्शन करतील. शासनाच्या अनेक कर्ज पुरवठा योजनांची माहिती एकाच छताखाली त्याच वेळी मिळणार आहे.