पीक पाहणी शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पीक पाहणी शिबिर
पीक पाहणी शिबिर

पीक पाहणी शिबिर

sakal_logo
By

00542
असळज : प्रत्यक्ष शेतात जाऊन मोबाईलवर ई पीकमधून नोंदी घेऊन ॲपसंबंधी शेतकऱ्यांशी संवाद साधताना करवीर उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर. शेजारी तहसीलदार संगमेश कोडे आदी.

डी. वाय. पाटील कारखान्यात पीक पाहणी शिबिर
असळज, ता. २५ : गगनबावडा महसूल विभागातर्फे असळज येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्यात कारखाना कर्मचारी वर्गासाठी पीक पाहणी शिबिराचे आयोजन केले होते. तहसीलदार संगमेश कोडे यांनी मार्गदर्शन केले.
तलाठी रियाज रेठरेकर यांनी ॲपच्या माध्यमातून पीक पाहणीविषयी माहिती कशी भरायची, याबद्दल प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिके, बांधावरील झाडांची संख्या, कायम पड व त्यांची माहिती ॲपमध्ये भरण्याबाबत मार्गदर्शन केले. या शिबिराच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे आपल्याला शेतकरी पालकांना व परिसरातील शेतकरी बांधवांना पीक पाहणी याबाबतची माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
नायब तहसीलदार संजय वळवी, कारखान्याचे सचिव नंदू पाटील, चीफ केमिस्ट पी. बी. देशमुख, शहाजी सुतार, तलाठी राजेश कुंटे, कोतवाल प्रशांत तटकरे व कारखाना कर्मचारी उपस्थित होते.

चौकट
प्रांताधिकाऱ्यांचा बांधावर जाऊन संवाद
दरम्यान, आज करवीर उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार कोडे यांनी गगनबावडा तालुक्यातील असळज व पळसंबे या गावी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन मोबाईलवर ई पीकमधून नोंदी घेतल्या व ॲपसंबंधी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Web Title: Todays Latest Marathi News Asj22b00297 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..