कुंभी प्रकल्पात 98 टक्के पाणीसाठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुंभी प्रकल्पात 98 टक्के पाणीसाठा
कुंभी प्रकल्पात 98 टक्के पाणीसाठा

कुंभी प्रकल्पात 98 टक्के पाणीसाठा

sakal_logo
By

००५४९

कुंभी मध्यम प्रकल्पात
९८ टक्के पाणीसाठा
५५२६ मिमी. पाऊस; १९० क्युसेक विसर्ग
सकाळ वृत्तसेवा
असळज, ता. २७ : गगनबावड्यासह पन्हाळा व करवीर या तीन तालुक्यांतील हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली आणणाऱ्या गगनबावडा तालुक्यातील कुंभी मध्यम प्रकल्पात ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे. लखमापूर येथील कुंभी मध्यम प्रकल्प क्षेत्रात आजअखेर ५५२६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातून वीजनिर्मितीसाठी १९० क्‍युसेक पाण्‍याचा विसर्ग कुंभी नदीपात्रात सुरू आहे.
पावसाचे आगार, अतिपावसाचा तालुका म्हणून गगनबावड्याची ओळख. मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे तालुक्यातील कोदे, अणदूर व वेसरफ हे तीन लघु पाटबंधारे प्रकल्प जुलैमध्येच भरले आहेत. लखमापूर येथील कुंभी मध्यम प्रकल्प गगनबावड्यासह पन्हाळा व करवीर या तीन तालुक्यांसाठी हजारो एकर शेती सिंचनासाठी महत्त्वाची मानली जाते. या प्रकल्पातून उन्‍हाळ्यात बॅकवॉटर योजनेद्वारे धामणी खोऱ्यातील गावांना या प्रकल्‍पाचा मोठा लाभ होतो. कोदे लघु प्रकल्प क्षेत्रात आजअखेर ५४०७ मिलिमीटर तर गगनबावडा तालुक्यात आजअखेर सरासरी ३७३९.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

कुंभी प्रकल्‍प
आजअखेर ६११.८८ मीटर पाणी पातळी
पूर्ण संचय क्षमता ७६.८८ दलघमी
क्षमतेच्‍या ९८.१३ टक्‍के साठा

Web Title: Todays Latest Marathi News Asj22b00301 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..