टुडे ३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे ३
टुडे ३

टुडे ३

sakal_logo
By

00587
असळज : येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्‍याच्‍या २८ व्‍या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना आमदार सतेज पाटील, समोर उपस्थित सभासद.
---------------------
गाळपासोबत डिस्‍टिलरीची क्षमता वाढविणार
सतेज पाटील : डी. वाय. पाटील कारखान्‍याची वार्षिक सभा

असळज, ता. ८ : कमीत कमी दिवसातील जास्तीच्या गाळपावरच कारखान्याचे भविष्यातील आर्थिक नियोजन ठरणार आहे. परिणामी गाळप क्षमतेत वाढ करावी लागणार आहे. साखरेसोबत उपपदार्थ प्रकल्पातून उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी कारखान्याच्या गाळपासोबत डिस्‍लरी व इथेनॉल प्रकल्पाची क्षमता वाढविणार असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केले. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्‍याच्‍या २८ व्‍या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘कारखान्यांसाठी योग्य आर्थिक नियोजन ही काळाची गरज आहे. शेतकरी वर्गास जादा दर व कर्ज परतफेड यातून कारखान्याची वाटचाल सुरू आहे. कारखान्याकडील उपपदार्थ प्रकल्पांच्या माध्यमातून एफआरपीपेक्षा जादा दर देणे शक्य होत आहे. आगामी हंगामात कारखान्याने ५.५० लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठरविले असून गाळपाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी शेतकरी वर्गाने पिकविलेला ऊस कारखान्यास गळितास पाठवून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
सभेपुढील सर्व विषयांना सभासदांनी बहुमताने मंजुरी दिली. विषय पत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक जयदीप पाटील यांनी केले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळावर संचालकपदी दुस-यांदा बिनविरोध निवड झालेबद्दल कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव करून कारखान्यातर्फे त्यांचा सत्कार झाला.
सभेस उपाध्यक्ष बंडोपंत कोटकर, संचालक मानसिंग पाटील, खंडेराव घाटगे, जयसिंग ठाणेकर, दत्तात्रय पाटणकर, गुलाबराव चव्हाण, चंद्रकांत खानविलकर, बजरंग पाटील, रवींद्र पाटील, संजय पडवळ, महादेव पडवळ, धैर्यशील घाटगे, अभय बोभाटे, रामचंद्र पाटील, सहदेव कांबळे, तानाजी लांडगे, सभासद, तोडणी वाहतूक कंत्राटदार, खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. एकनाथ लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले. सचिव नंदू पाटील यांनी आभार मानले.

५० रुपयांचा दुसरा हप्ता जाहीर
कारखान्‍याच्या २०२१-२२ च्या गाळप हंगामात ऊस पुरवठा केलेल्या उसास ५० रुपयांचा दुसरा हप्ता दस-यानंतर देणार असल्याची घोषणा आमदार सतेज पाटील यांनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Asj22b00320 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..