विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ
विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ

विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ

sakal_logo
By

00630
तिसंगी : म. ह. शिंदे महाविद्यालयात स्वागत समारंभात बोलताना संजय हळदीकर. शेजारी अन्य मान्यवर.

व्यक्तिमत्त्‍व विकासात सकारात्मकता हवी : हळदीकर
असळज, ता. २२ : ‘विद्यार्थ्यांना सामाजिक भान येण्यासाठी व्यक्तिमत्त्‍व विकासात सकारात्मकता आवश्यक आहे,’ असे मत ज्येष्ठ नाट्यकर्मी संजय हळदीकर यांनी व्यक्त केले. तिसंगी (ता. गगनबावडा) येथील म. ह. शिंदे महाविद्यालयात बी.ए., बी.एस्सी भाग १ मधील विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव स्वप्नील शिंदे हे प्रमुख उपस्थित तर अध्यक्षानी प्रभारी प्राचार्य डॉ. बी. एस. पडवळ होते.
हळदीकर म्हणाले, ‘‘संस्कारक्षम पिढी ही क्रमिक पुस्तकातून घडत नसते. विद्यार्थी ज्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक परिस्थितीत वावरतो तेथील वातावरणातून त्याच्या व्यक्तिमत्त्वात बदल होत असतो. आजचा काळ तंत्रज्ञानाचा असल्याने नाळ जपणारी संस्कृती आपण निर्माण करायला हवी.
एम. बी. सावंत, प्रा. अमर भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. एस. ए. मोरे यांनी केले. परिचय डॉ. विनोद कांबळे यांनी करून दिला. डॉ. एस. के. मेंगाणे यांनी सूत्रसंचालन केले. आभार डॉ.आर. पी. पाटील यांनी मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Asj22b00344 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..