स्पर्धेच्या तयारीत सातत्य हवे : शितोळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्पर्धेच्या तयारीत सातत्य हवे : शितोळे
स्पर्धेच्या तयारीत सातत्य हवे : शितोळे

स्पर्धेच्या तयारीत सातत्य हवे : शितोळे

sakal_logo
By

00670
तिसंगी : म. ह. शिंदे महाविद्यालयात आयोजित व्याख्यानात बोलताना यशवंत शितोळे. या वेळी प्रभारी प्राचार्य डॉ. बी. एस. पडवळ व अन्य.

स्पर्धेच्या तयारीत सातत्य हवे : शितोळे
असळज : ‘कुठल्याही स्पर्धा परीक्षेतील अपयश हे आयुष्याच अपयश नसते. त्यामुळे सातत्य अंगी बाळगून स्पर्धा परीक्षेची तयारी करायला हवी, असे मत महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी व्यक्त केले. तिसंगी (ता. गगनबावडा) येथील म. ह. शिंदे महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग आणि अग्रणी महाविद्यालय योजना यांच्यातर्फे आयोजित ‘स्पर्धा परीक्षा आणि आजची तरुणाई’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमास ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव स्वप्नील शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. बी. एस. पडवळ होते.
दुसऱ्या सत्रात प्रा. संदीप पाटील यांचे व्याख्यान झाले. डॉ. एस. ए. मोरे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. डॉ. डी. बी. इंगवले यांनी परिचय करून दिला. डॉ. विनोद कांबळे यांनी आभार मानले. डॉ. एस. के. मेंगाणे यांनी सूत्रसंचालन केले.