खडूळे येथे जागतिक अन्न दिवस साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खडूळे येथे जागतिक अन्न दिवस साजरा
खडूळे येथे जागतिक अन्न दिवस साजरा

खडूळे येथे जागतिक अन्न दिवस साजरा

sakal_logo
By

00686
खडूळे : येथे पाककला स्पर्धेत मूल्यांकन करताना प्रा. ऊके, प्रा. मस्के.

खडूळेत जागतिक अन्न दिवस
असळज, ता. १८ : संतुलित आहाराअभावी कुपोषण होते. याबद्दल जनजागृती करणे. ही समस्या कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे काम जागतिक अन्नदिनानिमित्त केले जाते. जागतिक अन्न दिन महत्वाचा आहे, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. प्रवीण ऊके यांनी केले. ते खडूळे (ता. गगनबावडा) येथे भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली पुरस्कृत डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे आयोजित जागतिक अन्न दिवस कार्यक्रमांत बोलत होते.
प्रा. ऊके यांनी पौष्टिक आहार व आहाराचे महत्त्वाबद्दल मार्गदर्शन केले. महिलांच्या आहार व महत्त्व याबद्दल प्रा. दीपाली मस्के यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आयोजित पाककला स्पर्धेस प्रतिसाद लाभला. मूल्यांकन प्रा. प्रवीण ऊके, प्रा. दीपाली मस्के यांनी केले. विजेत्या अशा : सौ. सरिता पाटील, सौ. चंद्रभागा पाटील (संयुक्त प्रथम क्रमांक), कु. भाग्यश्री पाटील (द्वितीय), योगिता पाटील (तृतीय), आरती पाटील (उत्तेजनार्थ).
कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी शहाजी पाटील, कृषी सहाय्यक प्रदीप गावडे, पोलिसपाटील बाजीराव पाटील, उपसरपंच प्रकाश पाटील, अनिल पाटील, ज्ञानदेव पाटील, आरती पाटील, कल्पना पाटील, उषाताई पाटील, गंगासागर मोरे, बाजीराव पाटील, राजू माने उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. निनाद वाघ, राजवर्धन सावंत-भोसले यांनी आभार मानले.