एस.टी. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एस.टी.
एस.टी.

एस.टी.

sakal_logo
By

अडीच वर्षांपासून
बावेलीकर बसच्या प्रतीक्षेत

कोरोना, एसटी संपामुळे अडीच वर्षांपासून पत्ताच नाही

असळज, ता. ११ : दोन-अडीच वर्षांतील कोरोना, गतवर्षी एस.टी. कर्मचा-यांचा संप यामुळे बंद असलेली बावेली एस.टी. खराब रस्त्यामुळे बंद आहे. गत दोन ते अडीच वर्षांत बावेली गावास एसटीच आलेली नाही. बस पूर्ववत सुरु करण्याबाबत राधानगरी-भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी संबंधित विभागास लेखी मागणी केली आहे. मात्र ही बस पूर्ववत होण्याचे वेध जनतेला लागले आहेत.
गगनबावडा तालुक्यातील बावेली प्रमुख गाव आहे. बावेली ग्रामपंचायतीत काटेवाडी, भटवाडी, गावठाण, वाण्याचीवाडी, धनगर वसाहत, पेठ वसाहत, हरिजन वसाहत आदी वाड्या-वस्त्यांचा समावेश होतो. गावात प्राथमिक, माध्यमिक शाळेबरोबर बाजार, रेशनिंग दुकान असल्याने लोकांची ये-जा असते. गगनबावड्यासह राधानगरी व कोल्हापूर अशा दिशेने येणाऱ्या प्रमुख मार्गावरुन येथे एस.टी होती. गगनबावडा आगाराची रंकाळा-कळे-म्हासूर्ली-बावेली ही गाडी मुक्कामी होती. मात्र कोरोना काळात बावेली बस बंद झाली. बावेली-कडवेदरम्यान धामणी नदीपात्रात लगतचा रस्ता खराब झाल्यामुळे बस बंदच आहे. कोनोलीजवळून बस मागे फिरते. पाच ते सहा गावांना बससाठी ६ किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. बस पूर्ववत सुरु करण्यासाठी चार ग्रामपंचायतींनी ठराव केले आहेत. बस कधी सुरु होते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

कोट
बावेलीस गगनबावडा, राधानगरी व कोल्हापूर येथून तीन बस यायच्या. अडीच वर्षात गावात येणा-या सर्व बस बंद आहेत. बसअभावी विद्यार्थ्यांना व जनतेला पायपीट करावी लागते. नागरिकांचे हाल थांबविण्यासाठी त्वरित बस सुरू करावा.
- युवराज कदम, ग्रामस्थ बावेली