आ.सतेज पाटील यांनी घेतलेल्या बैठकीनंतर महामार्गावरील पॅचवर्क करण्याचे काम सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आ.सतेज पाटील यांनी घेतलेल्या बैठकीनंतर महामार्गावरील पॅचवर्क करण्याचे काम सुरू
आ.सतेज पाटील यांनी घेतलेल्या बैठकीनंतर महामार्गावरील पॅचवर्क करण्याचे काम सुरू

आ.सतेज पाटील यांनी घेतलेल्या बैठकीनंतर महामार्गावरील पॅचवर्क करण्याचे काम सुरू

sakal_logo
By

00712
असळज : कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावर पॅचवर्क भरण्याचे सुरू असलेले काम.

कोल्हापूर-तळेरे महामार्गावर
पॅचवर्क कामाचा प्रारंभ

आ. सतेज पाटील यांच्या बैठकीनंतर गती

साळवण, ता. ११ : कोल्हापूर-गगनबावडा-तळेरे राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेबाबत आमदार सतेज पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक घेतली. या बैठकीत महामार्गाच्या दुरुस्तीबाबत आमदार पाटील यांनी सूचना दिल्या. बैठकीनंतर संबंधित विभागाने महामार्गावरील खड्डे भरण्याचे काम सुरू केले.
कोल्हापूर-तळेरे राष्ट्रीय महामार्गाचा वापर तळकोकण, गोवा राज्यांत जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात होतो. डी. वाय. पाटील, कुंभी कासारी, छत्रपती राजाराम, दालमिया या चार कारखान्याची ऊसवाहतूक या मार्गावरूनच होते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे महामार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तसेच वेळेवर उपचाराअभावी रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत आमदार सतेज पाटील व डी. वाय. पाटील कारखाना प्रशासनाने दोन्ही विभागांना रस्ता दुरुस्तीबाबत लेखी कळवले होते.
दरम्यान राष्ट्रीय महामार्ग विभाग, कोल्हापूरचे कार्यकारी अभियंता मुधाळे व सार्वजनिक बांधकाम (विशेष प्रकल्प) विभागाचे कार्यकारी अभियंता काटकर यांच्यासमवेत आमदार पाटील यांनी बैठक घेतली. बैठकीत महामार्ग दुरुस्तीचे काम त्वरित चालू न केल्यास आंदोलनाचा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला. या बैठकीनंतर पॅचवर्क दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू झाल्यामुळे वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे.