जिल्ह्यात १७.४५ लाख टन गाळप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात १७.४५ लाख टन गाळप
जिल्ह्यात १७.४५ लाख टन गाळप

जिल्ह्यात १७.४५ लाख टन गाळप

sakal_logo
By

००७१६, ००७१७

जिल्ह्यात १७.४५ लाख टन गाळप
सरासरी उतारा ९.३१; जवाहर कारखान्याची आघाडी
पंडित सावंत : सकाळ वृत्तसेवा
असळज, ता. १५ : जिल्ह्यातील १९ साखर कारखान्यांनी १४ नोव्हेंबरअखेर १७ लाख ४५ हजार ४७० टन उसाचे गाळप करून १६ लाख २८ हजार ५२‍० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ९.३१ आहे. गाळपात हुपरीच्या जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे.
चालू वर्षी लांबलेल्या पावसामुळे कारखाने सुरू होण्यास उशीर झाला. जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखाने दिवाळीनंतरच सुरू झाले. जिल्ह्यातील १९ साखर कारखाने सुरू झाले असून त्यात १३ सहकारी सहा खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. सहकारी साखर कारखान्यांनी १२ लाख तीन हजार ८५ टनाचे तर खासगी कारखान्यांनी पाच लाख ४२ हजार ३८५ टनाचे गाळप केले आहे.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी केलेले गाळप
कारखान्याचे नाव*कंसात केलेले गाळप (टनात)
जवाहर हुपरी*२,६२,५००
तात्यासाहेब कोरे वारणा*१,३२,४४०
सर सेनापती घोरपडे*१,३०,७००
गुरुदत्त शुगर्स*१,१९,५८०
दालमिया आसुर्ले पोर्ले*१,१६,८५०
छत्रपती शाहू कागल*१,१५,६५५
ओलम ॲग्रो राजगोळी खुर्द*१,१०,११६
दूधगंगा वेदगंगा बिद्री*१,०९,४११
शरद नरंदे*१,०८,०५०
कुंभी कासारी कुडित्रे*७६,८२०
छत्रपती राजाराम*७३,८००
डी. वाय. पाटील*७३,७९०
पंचगंगा-रेणुका शुगर्स*६२,४९०
सदाशिवराव मंडलिक कागल*६१,१९०
दत्त शिरोळ*५३,८१९
आजरा गवसे*४५,७२०
अथणी शुगर तांबाळे*४४,०८९
भोगावती परिते*२७,४००
इको केन, म्हाळुंगे*२१,०५००