
गगनबावडा तालुक्यात 49 मतदान केंद्र
गगनबावडा तालुक्यात ४९ मतदान केंद्रे
असळज, ता. १६ : गगनबावडा तालुक्यात रविवारी होणाऱ्या १८ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ४९ मतदान केंद्रांवर मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांनी दिली. तालुक्यातील २९ पैकी २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या ७० पथकांची नेमणूक केली आहे. कोदे, मार्गेवाडी व अणदूर या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. असळज, वेसर्डे व शेणवडेत सरपंचपद बिनविरोध झाले आहे. रविवारी होणाऱ्या १८ ग्रामपंचायतींच्या मतदानासाठी ४९ केंद्रांवर मतदान होईल. त्यासाठी ७० पथकांची नियुक्ती केली असून प्रत्येक पथकात ६ अधिकारी व कर्मचा-यांचा समावेश आहे. मतदान प्रक्रिया शांततेत होण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.