म. ह. शिंदे महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे बेमुदत काम बंद आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म. ह. शिंदे महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे बेमुदत काम बंद आंदोलन
म. ह. शिंदे महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

म. ह. शिंदे महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

sakal_logo
By

00904
शिंदे महाविद्यालयात बेमुदत काम बंद
साळवण : तिसंगी (ता. गगनबावडा) येथील म. ह. शिंदे महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नीत महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचा-यांचे प्रश्न तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत. याबाबत निवेदने, भेटी, बैठका व आंदोलन होऊनही प्रश्न सुटलेले नाहीत. मागण्यांची दखल घेतली नसल्याने त्यांनी २० फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. याप्रसंगी मुख्य लिपीक एम. पी. शिंदे यांनी मार्गदर्शन केले. आंदोलनात एम. पी. शिंदे, डी. एस. सातपुते, व्ही. ए. पोवार, एस. पी. चव्हाण, आर. आर. नलवडे, ई. बी. शिंदे, वाय. एस. तेली, डी. एम. पोवार, व्ही. के. पाटील, जी. एन. सरदेसाई, आर. आर. चव्हाण, जी. बी. सूर्यवंशी व ए. ए. पाटील आदी शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले.