‘डी. वाय.’ ची 31 जानेवारी अखेरची ऊस बिले जमा : आ.सतेज पाटील

‘डी. वाय.’ ची 31 जानेवारी अखेरची ऊस बिले जमा : आ.सतेज पाटील

00906
‘डी. वाय.’ची
३१ अखेरची बिले जमा : आमदार पाटील
असळज, ता. २२ : येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्‍याने चालू हंगामात १६ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२३ या पंधरवड्यात गाळप ऊसाचे १६ कोटी ८३ लाख ४८ हजार रुपयांचे ऊस बिल शेतकरी सभासद, बिगर सभासदांच्या बँक खात्यावर २३ फेब्रुवारीला वर्ग करत असल्याची माहिती अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिली. जानेवारीच्या दुस-या पंधरवड्यात गाळप केलेल्या ५६ हजार ११६ टन ऊसाचे ३००० रुपयांप्रमाणे होणारे बिल आदा केले आहे.
ते पुढे म्हणाले, ‘कारखान्याने चालू हंगामात २१ फेब्रुवारीअखेर ४ लाख ५६ हजार ८०० टन ऊसाचे गाळप करुन ४ लाख ९७ हजार ३५० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. सहवीजनिर्मिती प्रकल्पातून या हंगामात आजअखेर ४ कोटी ४७ लाख ३८ हजार ७२८ युनिट विजेची निर्मिती केली असून यातून कारखाना वापर वजा जाता ३ कोटी ७ लाख १६ हजार युनिट वीज निर्यात केली. यावेळी कारखान्‍याचे संचालक, कार्यकारी संचालक जयदीप पाटील, सेक्रेटरी नंदकुमार पाटील, खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com