जळाऊ लाकूड अवैध वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा दाखल. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जळाऊ लाकूड अवैध वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा दाखल.
जळाऊ लाकूड अवैध वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा दाखल.

जळाऊ लाकूड अवैध वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा दाखल.

sakal_logo
By

00912

असळज : अवैध लाकूड वाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेताना वनक्षेत्रपाल अविनाश तायनाक व वनरक्षक.
...


जळाऊ लाकूड अवैध
वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा
---
गगनबावडा वनक्षेत्रातील असळज येथे कारवाई
असळज, ता. २६ : जळाऊ लाकूड अवैध वाहतूक करण्याच्या कारणावरून गगनबावडा वन विभागाने एकावर गुन्हा दाखल केला आहे. संदीप शामराव तटकरे (रा. खोकुर्लेपैकी पडवळवाडी) या ट्रकचालकास मालासह ताब्यात घेण्यात आले.
गगनबावडा वनक्षेत्रात वनक्षेत्रपाल व वनरक्षक दुपारी गस्त घालत होते. असळज येथे दुपारी साडेतीनच्या सुमारास आले असता जळाऊ लाकडाने भरलेला ट्रक आढळला. रीतसर वाहतूक परवानगी पासची मागणी केली असता तो पास नसल्याचे निदर्शनास आले. श्री. तटकरे यांच्यावर वन विभाग अधिनियमाचे उल्लंघन‌ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी करण्यासाठी मालासह ट्रक ताब्यात घेतला आहे. कोल्हापूर उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल अविनाश तायनाक, वनरक्षक प्रकाश खाडे, मनीषा हायकर, नितीन शिंदे, खंडू कोरे, संग्राम पाटील, शिवाजी निकम, रईसा मुल्ला यांनी ही कारवाई केली.
...

पंधरवड्यात दुसरी कारवाई
गगनबावडा वन विभागाने अवैध शिकार करणाऱ्या तिघांवर यापूर्वी कारवाई केली होती; तर आता अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्यावर कारवाई केली आहे. पंधरवड्यातील ही दुसरी कारवाई होय.
...