
जीवन आनंदाने जगायला शिका : माजी प्राचार्य एम. ए. शिंदे
तिसंगीत पाटील विद्यालयात
माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
साळवण, ता. १२ : संस्कारसंपन्न मुले हीच खरी संपत्ती आहे. दोन अक्षराचे लक, अडीच अक्षराचे भाग्य व तीन अक्षराचे नशीब उघडायचे असेल तर चार अक्षरी मेहनत करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी प्राचार्य एम. ए. शिंदे यांनी केले. ते तिसंगी (ता. गगनबावडा) येथील मा. दत्ताजीराव मोहिते पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित २००१-०२ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्यात अध्यक्षपदावरून बोलत होते.
प्रारंभी दिवंगत वर्गमित्रांना श्रद्धांजली वाहण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन माजी प्राचार्य एम. ए. शिंदे, आर. डी. वाघरे, आर. एस. देसाई, पी. व्ही. पाटील, एस. एस. शिरोलीकर यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा पुस्तक देऊन सत्कार केला. कोरोना काळात चांगले काम केलेले वर्गमित्र डॉक्टर, आरोग्यसेविकांचा सत्कार झाला. वर्गमैत्रीण अर्चना खाडे हिचे निधन झाल्यामुळे तिच्या कुटुंबीयांना पाच हजारांची मदत देण्याचा निर्णय झाला. स्नेहमेळावा यशस्वीतेसाठी शंकर शिंदे, आकाराम हंकारे, उदय चव्हाण, आनंदा मार्गे, दिनकर शिंदे, मनीषा पाटील, सुरेखा कांबळे, मधुजा पाटील यांनी परिश्रम घेतले. आकाराम हंकारे व मनीषा पाटील यांनी स्वागत केले. प्रा. दीपक कांबळे यांनी प्रास्ताविक, बाबासाहेब कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. शंकर शिंदे यांनी आभार मानले.