Sat, June 10, 2023

विनापरवाना लाकूड वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा दाखल.
विनापरवाना लाकूड वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा दाखल.
Published on : 7 March 2023, 6:59 am
विनापरवाना लाकूड
वाहतूकप्रकरणी एकावर गुन्हा
साळवण, ता.७ : गगनबावडा वनक्षेत्रामध्ये विनापरवाना जळाऊ व इमारतीचे लाकूड वाहतूक करणाऱ्यावर तालुका वनविभागाने कारवाई केली आहे. भारतीय वन अधिनियम उल्लंघन केल्याप्रकरणी युवराज दत्तू खापणे (रा.माळवाडी, ता.पन्हाळा) याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. एका महिन्यातील वनविभागाची ही तिसरी कारवाई होय.
गगनबावडा वनक्षेत्रपाल व असळज वनरक्षक हे प्रमुख मार्गावर गस्त घालत होते. रात्री साडेनऊच्या सुमारास तिसंगी येथे आयशर टेम्पो आढळला. टेम्पोत जळाऊ व इमारतीची लाकडे होती. टेम्पोचालकाकडे निर्गत पासची मागणी केली असता तो नसल्याचे आढळले. अवैध वाहतूक करणाऱ्या युवराज खापणे याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. मालासह हा टेम्पो वनविभागाने ताब्यात घेतला आहे.