मांडुकली केंद्रशाळेत जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा संपन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मांडुकली केंद्रशाळेत जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा संपन्न
मांडुकली केंद्रशाळेत जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा संपन्न

मांडुकली केंद्रशाळेत जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा संपन्न

sakal_logo
By

मांडुकली केंद्रशाळा
असळज : जागतिक महिला दिनानिमित्‍त मांडुकली (ता.गगनबावडा) येथील केंद्रशाळेत विविध स्‍पर्धा झाल्या. महिलांसाठी संगीत खुर्ची, लिंबू-चमचा, बादलीत चेंडू टाकणे, वाटाणे निवडणे, कपाळी टिकल्या लावणे, तळ्यात मळ्यात आदि स्पर्धा झाल्या. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्‍वागत मुख्याध्यापिका राधीका पाटील यांनी तर प्रास्तावीक अध्यापिका समिधा पोवार यांनी केले. कार्यक्रमप्रसंगी जवान अनिकेत देसाई, केरबा आंबेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पंडित सावंत, सदस्या, महिला, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या. समिधा पोवार यांनी आभार मानले. विविध स्पर्धांतील दोन विजेत्‍या अनुक्रमे : लिंबू-चमचा : स्वाती पडवळ, प्रियांका टिपुगडे. बादलीत चेंडू टाकणे : विमल सावंत, अश्विनी पडवळ. वाटाणे निवडणे : सुप्रिया पाटील, माधुरी पडवळ. कपाळी टिकल्या लावणे : माधुरी पडवळ, अश्विनी पडवळ. हात बांधून चेंडू टाकणे : निकिता पडवळ, पुष्पा आंबेकर. तळ्यात मळ्यात : आरती पडवळ, माधुरी पडवळ. संगीत खुर्ची : प्रियांका टिपुगडे, अर्पिता सावंत.