गगनबावड्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद.

गगनबावड्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद.

00935
गगनबावड्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
असळज : सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी पुकारलेल्या बेमुदत बंदला गगनबावडा तालुक्यातून पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वच संघटनांनी तहसील कार्यालयात उपस्थित राहून सर्वांनी सहभाग नोंदविला. तहसीलदार संगमेश कोडे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. २००५ नंतर शासकीय सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना सरकारने बंद केली आहे. ती पूर्ववत सुरू करावी या मागणीसाठी १४ मार्चपासून बेमुदत बंद पुकारला आहे. सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी तहसिलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक कर्मचारी संघटना, आरोग्य, ग्रामसेवक संघटना, पंचायत समिती, महसूल, वनविभाग, बांधकाम महावितरणसह शासकीय, निमशासकीय संघटनांतर्फे सकाळी ११ च्या सुमारास तहसील कार्यालयासमोर उपस्थिती लावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com