सतेज चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये ‘आर्यन’ विजेता, ‘किरवे’ उपविजेता ‘आर्यन’ विजेता, ‘किरवे’ उपविजेता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सतेज चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये ‘आर्यन’ विजेता, ‘किरवे’ उपविजेता
‘आर्यन’ विजेता, ‘किरवे’ उपविजेता
सतेज चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये ‘आर्यन’ विजेता, ‘किरवे’ उपविजेता ‘आर्यन’ विजेता, ‘किरवे’ उपविजेता

सतेज चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये ‘आर्यन’ विजेता, ‘किरवे’ उपविजेता ‘आर्यन’ विजेता, ‘किरवे’ उपविजेता

sakal_logo
By

00943
गगनबावडा : येथे आयोजित सतेज चषक स्पर्धेतील विजेता संघ. सोबत मान्यवर.

सतेज चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये
‘आर्यन’ विजेता, ‘किरवे’ उपविजेता
असळज, ता. २५ : गगनबावडा किक्रेट क्लबतर्फे आयोजित सतेज चषक क्रिक्रेट स्पर्धेत आर्यन स्पोर्टस्, गारीवडेचा संघ विजेता, तर किरवे स्पोर्टस् उपविजेता ठरला. गगनबावडा येथील मैदानावर या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत २० संघांनी सहभाग घेतला होता.
पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेचे उद्‍घाटन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते झाले. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : प्रथम-आर्यन स्पोर्टस् गारीवडे,‍ द्वितीय-किरवे स्पोर्टस् किरवे, तृतीय-गगनबावडा अ, चतुर्थ-खंबय्या रामेश्‍वर मणदूर.
सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून सुनील गुरव, उत्कृष्ट गोलंदाज इंद्रजित पाटील व मालिकावीर म्हणून एकनाथ पाटील यांना गौरविण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. या वेळी संयोजन समितीचे अमर भांबुरे, ‍विजय परीट, महेंद्र पाटील, रवी खोत, तसेच प्रमुख पाहुणे प्रकाश पाटील, राजेश पाटील, रमेश पाटील, अविनाश भांबुरे, गवळी, धनाजी शिंदे, वृंदा पाध्ये, दीपक घाटगे, विनोद प्रभूलकर, संतोष गावडे, सोमप्रकाश माळी आदी उपस्थित होते.