
मांडुकलीत गव्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
01012
...
मांडुकलीत गव्याच्या
हल्ल्यात शेतकरी जखमी
साळवण, ता.३१: गव्याने केलेल्या हल्ल्यात मांडुकली (ता.गगनबावडा) येथील शेतकरी जखमी झाले. तानाजी सदाशिव पाटील (वय ३६) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, तानाजी पाटील हे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मांडुकली येथील ''मळा'' नावाच्या शेताजवळ विद्युत मोटरीकडे जात होते. यावेळी उसाशेजारी दबा धरून बसलेल्या गव्याचा अंदाज त्यांना आला नाही. मात्र त्यानंतर गवा रेडा आपणास धडक मारण्यासाठी येत असल्याचे तानाजी यांच्या वेळीच लक्षात आल्यामुळे ते उसाच्या सरीमध्ये खाली आडवे झाले. यावेळी गवा रेडा आपले शिंग त्यांच्या पाठीवर मारून बाजूला गेला. तानाजी यांच्या पाठीवर जखम झाली. दहा मिनिटे ते बेशुद्ध अवस्थेत होते. शुध्दीवर आल्यानंतर प्रसंगावधान राखून स्वतःला सावरत ते उसातून बाहेर आले.