
रामनवमी उत्सव गगनबावड्याचा लोकोत्सव होईल : विलास महाराज
01023
गगनबावडा : येथील ऐतिहासिक श्रीराम नवमी विशेषांकाच्या प्रकाशनप्रसंगी उपस्थित मान्यवर.
रामनवमी उत्सव गगनबावड्याचा
लोकोत्सव होईल : विलास महाराज
असळज, ता. ८ : नवनाथांच्या पुण्यभूमीमध्ये नव्या जोमाने सुरू झालेला रामनवमी उत्सव हा भविष्यात गगनबावड्याचा लोकोत्सव होईल, असा आशावाद वेताळ आश्रमाचे उंबरनाथगिरी तथा विलास महाराज यांनी व्यक्त केला. रामनवमी विशेषांक प्रकाशन समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गगनगड ट्रस्टचे व्यवस्थापक शांताराम बापू पाटणकर हे होते.
ए. बी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. या वेळी विनायक सणगर, साईप्रसाद बोभाटे, नंदकुमार पोवार, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पी. जी. शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास गगनबावडा सरपंच मानसी कांबळे, उपसरपंच वृंदा पाध्ये, कातळीच्या सरपंच सुनीता लांबोर, डॉ. डी. वाय. पाटील कारखान्याचे संचालक अभय बोभाटे, श्रीकृष्ण सरस्वती मठाचे व्यवस्थापक फत्तेसिंग रजेमाने, रमेश माने, माजी पंचायत समिती सदस्य आनंदराव पाटील, राजू मसुरकर, सचिन सावंत, गणपतराव भांबुरे, योगेश गावकर, वैभव पोवार, नरेंद्र सरदेसाई, सुळेकर उपस्थित होते. कुंडलिक जाधव यांनी सूत्रसंचालन केले. आनंद पाटील यांनी आभार मानले.