झरेतील गुन्हेगारावर दोन वर्षासाठी चार जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झरेतील गुन्हेगारावर दोन वर्षासाठी चार जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई
झरेतील गुन्हेगारावर दोन वर्षासाठी चार जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई

झरेतील गुन्हेगारावर दोन वर्षासाठी चार जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई

sakal_logo
By

03346
स्वप्निल पाटील

झरेचा वाळू तस्कर हद्दपार

चार जिल्ह्यांसाठी दोन वर्षांकरिता कारवाई

आटपाडी, ता. ११ ः स्वप्निल ऊर्फ नवनाथ अण्णा पाटील (वय ३०, रा. झरे. ता. आटपाडी) या गुन्हेगार आणि वाळू तस्करावर सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपारीची कारवाई उपविभागीय दंडाधिकाऱ्यानी आज केली. त्याच्यावर वाळू तस्करीचे आटपाडी पोलिस ठाण्यात सहा ते सात गुन्हे दाखल आहेत. स्वतःचे दोन ट्रॅक्टर आणि जेसीबीच्या साह्याने राजरोस वाळूची तस्करी करीत होता. वाळू तस्करी करताना पोलिस आणि महसूल प्रशासनाने पकडून अनेकवेळा कारवाई केली आहे. प्रत्येक वेळी कारवाई केल्यानंतर त्याने वाळू तस्करी थांबवली नव्हती. याशिवाय सार्वजनिक शांतता भंग केल्याबद्दलही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी पोलिस ठाण्याजवळ झालेल्या राड्यात स्वप्निलचा सहभाग होता. राजू जानकर यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. तसेच, झरे परिसरात दहशत निर्माण करणे, दमदाटी करणे, सार्वजनिक आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, शासकीय मालमत्तेचे चोरी करणे यासारखे त्याच्यावर गंभीर गुन्हे आटपाडी पोलिस ठाण्यात दाखल आहेत. तो एका राजकीय पक्षातील नेतेमंडळीशी संबंधित होता. त्याला वेळोवेळी राजकीय वरदहस्त मिळत होता. त्यामुळे त्याने गुन्हे दाखल होऊनही वाळू तस्करी थांबवली नव्हती. अखेर उपविभागीय दंडाधिकारी यांनी स्वप्निल ऊर्फ नवनाथ पाटील याला दोन वर्षांसाठी सांगली, सातारा आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांतून हद्दपारीची आज कारवाई केली. या कारवाईमुळे त्याच्याशी संबंध असलेले आणि गुन्हे दाखल असलेल्या लोकांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Atp22b03091 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top