उदयराज पाटील ठरला बिद्रीचा मानधनधारक मल्ल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उदयराज पाटील ठरला बिद्रीचा मानधनधारक मल्ल
उदयराज पाटील ठरला बिद्रीचा मानधनधारक मल्ल

उदयराज पाटील ठरला बिद्रीचा मानधनधारक मल्ल

sakal_logo
By

01302
बिद्री : कुस्ती स्पर्धेतील खुल्या गटातील विजेत्या उदयराज पाटील याला बक्षीस देताना के. पी. पाटील, विठ्ठलराव खोराटे, हिंदकेसरी दिनानाथसिंह, विनोद चौगले, राम सारंग, रवींद्र पाटील आदी.
उदयराज पाटील ठरला
बिद्रीचा मानधनधारक मल्ल
बिद्री, ता. ६ : येथील दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्यातर्फे आयोजित मॅटवरील कुस्ती स्पर्धेत अर्जुनवाड्याच्या उदयराज पाटील याने खुल्या गटात निढोरीच्या रोहन रंडेवर ९-२ अशा फरकाने मात करत बिद्रीचा मानधनधारक मल्ल होण्याचा बहुमान मिळवला. अक्षय साळवी (बानगे) याने ७४ किलो गटात अतुल मगदूम (इस्पुर्ली) वर १२-५ गुणांनी मत करत विजेतेपद मिळवले.
तीन दिवस विविध १४ वजनी गटात झालेल्या स्पर्धेचा आज समारोप झाला. तीनही दिवस मैदानाला मोठा प्रतिसाद मिळाला. कार्यक्षेत्रातील ३१० मल्लांनी भाग घेतला. स्पर्धा संयोजनाबद्दल अध्यक्ष के. पी. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी पुढील वर्षांपासून कारखान्यातर्फे दरवर्षी कुस्ती स्पर्धा भरविण्याचा शब्द उपस्थितांना दिला.
स्पर्धेतील गटनिहाय अन्य विजेते असे -७० किलो- साताप्पा हिरुगडे (बानगे), ६५ किलो - अजय कापडे, ६१ किलो - सूरज अस्वले (दोघे आणूर), ६० किलो -राजवर्धन पुजारी (मुरगूड), ५७ किलो - हिंतेंद्र कांबळे (गारगोटी), ५५ किलो - सुशांत पाटील (म्हाकवे), ५० किलो -हर्षवर्धन मेथे (बानगे), ४५ किलो - प्रणव घारे (तिटवे), ४० किलो - यशवर्धन पोवार (बिद्री), ३५ किलो - अविनाश तोरस्कर (गंगापूर), ३० किलो -समरजित पाटील (मांगेवाडी),२५ किलो गट -शुभम जठार ( बानगे).
या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, हिंदकेसरी दिनानाथसिंह, हिंदकेसरी विनोद चौगले, राष्ट्रकुल पदक विजेते राम सारंग, उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील, उपमहाराष्ट्र केसरी रामा माने, राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष संभाजी वरुटे, जिल्हा तालीम संघाचे माजी उपाध्यक्ष प्रकाश खोत, गोकुळचे संचालक विजयसिंह मोरे आदी उपस्थित होते. कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Bdr22b00954 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top