बोरवडेत कुंभार समाजाचा मेळावा संपन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोरवडेत कुंभार समाजाचा मेळावा संपन्न
बोरवडेत कुंभार समाजाचा मेळावा संपन्न

बोरवडेत कुंभार समाजाचा मेळावा संपन्न

sakal_logo
By

बोरवडेत कुंभार समाजाचा मेळावा
बिद्री, ता. ३ : कुंभार समाजाला वीट व्यवसायासाठी शासनाची रॉयल्टी माफ असताना काही ठिकाणी समाजबांधवांची लुबाडणूक केली जाते. याबाबत समाजबांधवांनी नियमांची माहिती घेऊन स्वतःची फसगत टाळावी, असे अखिल महाराष्ट्र कुंभार समाजविकास संस्थेचे जिल्हाध्यक्ष संतोष कुंभार यांनी सांगितले.
बोरवडेपैकी कुंभारवाडा (ता. कागल) येथे समाजबांधवांच्या आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नारायण कुंभार होते.
माती उत्खनन परवानगी व रॉयल्टी, पॉटरी व्यवसायातील नवीन संधी, दिल्लीतील खरुजा येथे असलेल्या मातीकला प्रशिक्षणासाठी असलेली मोफत सोय, ओबीसी दाखले मिळण्याबाबत; तसेच शैक्षणिक सवलती, मुला-मुलींच्या विवाह संबंधित संधी व अन्य सामाजिक अडचणींच्या निवारणासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
कुंभार म्हणाले, की सतत बदलणारे हवामान आणि शासनाचे नवनवीन आदेश यामुळे कुंभार समाजासमोरील आव्हाने वाढत आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी समाजबांधवांनी समाजविकास संघटनेच्या माध्यामातून संघटित होण्याची आवश्यकता आहे.
जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत कुंभार, श्रीकांत कुंभार, सागर कुंभार, दिनकर कुंभार, सूर्याजी कुंभार, शंकर कुंभार, उपाध्यक्ष उत्तम कुंभार उपस्थित होते. विक्रम कुंभार यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Bdr22b00969 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top