बोरवडेत विजेच्या धक्क्याने म्हशीचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोरवडेत विजेच्या धक्क्याने म्हशीचा मृत्यू
बोरवडेत विजेच्या धक्क्याने म्हशीचा मृत्यू

बोरवडेत विजेच्या धक्क्याने म्हशीचा मृत्यू

sakal_logo
By

विजेचा धक्का बसून
बोरवडेत म्हशीचा मृत्यू
बिद्री, ता. २२ : बोरवडे (ता. कागल) येथील गावतलावावर उच्च दाबाच्या वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने धक्का बसून म्हशीचा जागीच मृत्यू झाला. यामुळे शेतकरी अनिल विष्णू नाटले यांचे सुमारे पन्नास हजारांचो नुकसान झाले. ही घटना आज दुपारी चारच्या सुमारास घडली.
घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, बोरवडेतील अनिल नाटले हे म्हैस धुण्यासाठी गावतलावावर गेले होते. तेथे ट्रान्स्फॉर्मरला म्हशीचा स्पर्श झाल्याने विजेचा जोरदार धक्का बसून तिचा जागीच मृत्यू झाला. मालक अनिल नाटले यांनी प्रसंगावधान राखल्याने बचावले. घटनास्थळी वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पुरवठा बंद केला.
महावितरणचे अधिकारी गिरीश भोसले, रणजित जरवाल यांनी भेट दिली. ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीने अनिल नाटले यांना भरपाई द्यावी, अशी मागणी केली. याबाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Bdr22b01006 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top