बिद्रीतील नवीन जलकुंभाचे श्रेय सत्ताधाऱ्यांनी घेऊ नये : | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिद्रीतील नवीन जलकुंभाचे श्रेय सत्ताधाऱ्यांनी घेऊ नये :
बिद्रीतील नवीन जलकुंभाचे श्रेय सत्ताधाऱ्यांनी घेऊ नये :

बिद्रीतील नवीन जलकुंभाचे श्रेय सत्ताधाऱ्यांनी घेऊ नये :

sakal_logo
By

‘बिद्रीतील नवीन जलकुंभाचे
श्रेय सत्ताधाऱ्यांनी घेऊ नये’

बिद्री ता. २ : येथे महापारेषणच्या सीएसआर फंडातून नव्याने उभारलेल्या जलकुंभाच्या मंजुरीसाठी तत्कालिन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार प्रा.संजय मंडलिक, शाहूचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचे योगदान आहे.परंतू यामध्ये काडीचाही वाटा नसणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांनी यापुढे दुसऱ्याच्या कामाचे श्रेय लाटू नये, अशी माहिती विरोधी गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी दिली.
येथे नवीन बांधलेल्या जलकुंभाचे मंगळवारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन झाले. या संदर्भात पत्रकारांना माहिती देताना विरोधी गटाने जलकुंभाच्या उभारणीमागील भूमिका स्पष्ट केली.माजी उपसरपंच साजन पाटील म्हणाले,‘२०१८-२०१९ मध्ये तत्कालिन ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या मान्यतेने आणि महसूलमंत्री पाटील, मंडलिक, घाटगे यांच्या सहकार्यातून ७२ लाख रुपयांची नवीन जलकुंभ योजना मंजूर झाली. याकामी तत्कालिन ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले. परंतु त कोरोनाच्या संकटामुळे ही योजना पूर्ण होण्यास विलंब झाला. आता जलकुंभाचे काम पूर्ण झाल्यानंतर सत्तेवर असलेल्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी हे काम आपणच केल्याचा कांगावा केला आहे. जलकुंभाच्या उदघाटनाच्या पत्रिकेत पाठपुरावा करणाऱ्या नेतेमंडळी आणि जुन्या सदस्यांची नावे घातलेली नाहीत. पांडूरंग संतराम पाटील, ग्रा. पं. सदस्य सुशांत चौगले, संदेश पाटील, योगेश पाटील, जयवंत कांबळे, शहाजी ढवण उपस्थित होते.
नाममात्र मोबदला घेऊन जलकुंभासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्याच्या आई-वडिलांचे नाव जलकुंभाला देण्याचे जुन्या सदस्य मंडळाने ठरवले होते .गावासाठी स्वतःची जमीन देणाऱ्या भूमिपुत्राचे नावही जलकुंभाच्या उदघाटन पत्रिकेमध्ये घातले नसल्याची खंत सुनील पाटील यांनी बोलून दाखवली.

Web Title: Todays Latest Marathi News Bdr22b01034 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..