बिद्रीच्या विरोधकांनी गेटवर सभा घेत केला सत्ताधाऱ्यांचा निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिद्रीच्या विरोधकांनी गेटवर सभा घेत केला सत्ताधाऱ्यांचा निषेध
बिद्रीच्या विरोधकांनी गेटवर सभा घेत केला सत्ताधाऱ्यांचा निषेध

बिद्रीच्या विरोधकांनी गेटवर सभा घेत केला सत्ताधाऱ्यांचा निषेध

sakal_logo
By

01475

लै भारीचं तुणतुणं वाजवू नका
‘बिद्री’च्या समांतर सभेत इशारा; सहवीजच्या नफ्यातून पाच हजार भरा

सकाळ वृत्तसेवा
बिद्री, ता. २१ : बिद्री कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील एकाधिकारशाहीने कारभार करत आहेत. कारभार लै भारी म्हणता, तर गोदामात सभा का घेतली, तुमचा कारभार चांगला असेल, तर खुल्या माळावर सभा का घेतली नाही, अध्यक्षांनी लै भारीचे तुणतुणं वाजवण्यापेक्षा सहवीज प्रकल्पाच्या नफ्यातील पाच हजार रुपये भागभांडवलास वर्ग न केल्यास बिद्री बचाव समितीतर्फे तीव्र लढा उभारण्याचा इशारा जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर, बाबा नांदेकर व अशोक फराकटे यांनी दिला. कारखान्याच्या प्रवेशद्वारात झालेल्या समांतर सभेत ते बोलत होते.
मुख्य चौकातून विरोधी गटाच्या सभासदांनी एकत्रित येत मुख्य गेटवर निषेध सभा घेतली. शेअर्सचे घेतलेले पाच हजार रुपये परत करावेत, ऊस तोड वाहतूक नियमानुसार करावी, एफआरपीपेक्षा प्रतिटन ५०० रुपये जादा दर मिळावा, अशा घोषणा देत विरोधकांनी परिसर दणाणून सोडला.
अशोक फराकटे, बाबा नांदेकर, बालाजी फराकटे, अरुणराव जाधव, नंदकुमार पाटील, शहाजी गायकवाड, विजय बलुगडे, कल्याणराव निकम, अशोक वारके, सुभाष पाटील, मदन देसाई, विश्वनाथ पाटील, सुमित चौगले, राजू वाडकर, नंदकुमार पाटील, अक्षय पाटील, सचिन वारके, भिकाजी पाटील, अरविंद पाटील यांच्यासह सभासद उपस्थित होते.


बनावटगिरीत लै भारी!
निषेध सभेवेळी बाबा नांदेकर म्हणाले, ‘‘शासनाच्या परिपत्रकाचा गैरफायदा घेत बिद्रीने भागभांडवल १५ हजार रुपये केले; परंतु राज्यात आणि देशात स्वतःला लै भारी म्हणणाऱ्या अध्यक्षांचा कारभारच बनावट आहे. एवढेच काय तर नफा तोटा पत्रक वाढवलेला त्यांचा अहवालही बनावट असून बिद्री देशात बनावटगिरीत लै भारी आहे.’’

Web Title: Todays Latest Marathi News Bdr22b01048 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..