बिद्रीचे दहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिद्रीचे दहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट
बिद्रीचे दहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

बिद्रीचे दहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

sakal_logo
By

०१४९०
बिद्री : ६० व्या गळीत हंगामाचा गव्हाणीत मोळी टाकून प्रारंभ करताना के. पी. पाटील, विठ्ठलराव खोराटे, संचालक, आर. डी. देसाई, के. एस. चौगले आदी. ( फोटो – चांदेकर फोटो, बिद्री)
------------------
दहा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट
के. पी. पाटील ; बिद्रीचे ६० वा गळीत हंगाम सुरू

बिद्री ता.६ ः विस्तारीकरण व अत्याधुनिक मशिनरींनी सज्ज बिद्री साखर कारखाना चालू गळीत हंगामात प्रतिदिन साडेसात ते आठ हजार मे. टन ऊस गाळप करणार आहे. दहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ठ ठेवल्याची माहिती अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांनी दिली. उच्चांकी दर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ६० व्या गळीत हंगामाचा प्रारंभ अध्यक्ष श्री. पाटील यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून झाला. यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी तोडणीचा प्रारंभ संचालक श्रीपती पाटील तर काटापूजन संचालक उमेश भोईटे यांच्या हस्ते झाले. गव्हाणीचे पूजन संचालक प्रवीणसिंह पाटील व सौ. सुहासिनीदेवी पाटील यांच्याहस्ते झाले.
के. पी. पाटील म्हणाले, ‘चालू हंगामासाठी १२५० वाहनांनी वाहतूक करार केले आहेत. गतहंगामापेक्षा १५० अधिक करार असून यामध्ये बीड भागातील ८० ऊसतोड टोळ्यांचा समावेश आहे. पुढील आठवड्यात गाळपास प्रारंभ होईल.’ समारंभास उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, संचालक ए. वाय. पाटील, बाबासाहेब पाटील, गणपती फराकटे, राजेंद्र पाटील, धनाजीराव देसाई, प्रवीण भोसले, श्रीपती पाटील, धोंडीराम मगदूम, उमेश भोईटे, एकनाथ पाटील, मधुकर देसाई, के.ना. पाटील, युवराज वारके, प्रदीप पाटील, जगदीश पाटील, अशोक कांबळे, संचालिका सौ. नीताराणी सूर्यवंशी, सौ. अर्चना पाटील, सुनीलराज सूर्यवंशी, विकास पाटील- कुरुकलीकर, कामगार संचालक शिवाजी केसरकर, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाईंसह मान्यवर उपस्थित होते. कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी स्वागत, सचिव एस. जी. किल्लेदार यांनी आभार मानले.