''बिद्री''चा डिस्टिलरी प्रकल्प सभासदांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''बिद्री''चा डिस्टिलरी प्रकल्प सभासदांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणेल
''बिद्री''चा डिस्टिलरी प्रकल्प सभासदांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणेल

''बिद्री''चा डिस्टिलरी प्रकल्प सभासदांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणेल

sakal_logo
By

०१५०७
बिद्री : येथील दूधगंगा वेदगंगा कारखाना कार्यस्थळी होणाऱ्या डिस्टिलरी प्रकल्पाच्या भूमिपूजनावेळी अध्यक्ष के. पी. पाटील, विठ्ठलराव खोराटे, नीताराणी सूर्यवंशी, सुनीलराज सुर्यवंशींसह संचालक,अधिकारी. (छायाचित्र ः चांदेकर फोटो, बिद्री)
----------------------------

‘बिद्री’चा डिस्टिलरी प्रकल्प
सोन्याचे दिवस आणेल

अध्यक्ष पाटील; कारखाना कार्यस्थळी भूमिपूजन

बिद्री, ता. २८ : देशात इथेनॉलची मागणी वाढत आहे. बिद्री कारखान्याने डिस्टिलरी प्रकल्प उभारणीचा निर्णय योग्यवेळी घेतला आहे. वर्षभरात जलदगतीने प्रकल्प पूर्ततेसाठी सर्वांच्या सहकार्याने कसोशीने प्रयत्न करू. हा प्रकल्प कष्टकरी ऊस उत्पादकांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणेल, असा विश्‍वास कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांनी व्यक्त केला.
बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी कारखान्याच्यावतीने कार्यस्थळावर होणाऱ्या ६० हजार केएलपीडी प्रतिदिन क्षमतेचा आसवणी (डिस्टिलरी) प्रकल्प भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. संचालिका सौ. नीताराणी सूर्यवंशी व माजी उपाध्यक्ष सुनीलराज सुर्यवंशी यांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. यावेळी अध्यक्ष के. पी. पाटील म्हणाले, ‘बिद्री कारखान्याने सहवीज, इथेनॉल प्रकल्प, गाळप विस्तारीकरण उपक्रम यशस्वी करुन सभासदांनी संचालकांवर टाकलेला विश्वास सार्थ ठरवला. अधिकारी, कर्मचारी व कामगार वर्गाच्या सहकार्यामुळे नवीन डिस्टिलरी प्रकल्प वर्षभरात पूर्ण करून यशस्वी करवण्याची जबाबदारी सर्वजण पार पाडू.’ याप्रसंगी उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, संचालक गणपतराव फराकटे, राजेंद्र पाटील, उमेश भोईटे, मधुकर देसाई, एकनाथ पाटील, के. ना. पाटील, जगदीश पाटील, श्रीपती पाटील, युवराज वारके, अशोक कांबळे, सौ. नीताराणी सूर्यवंशी, सौ. अर्चना पाटील, कामगार प्रतिनिधी शिवाजीराव केसरकर, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक के. एस. चौगले, डिस्टिलरी इन्चार्ज एस. पी. शेंडगेंसह खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सचिव एस. जी. किल्लेदार यांनी आभार मानले.