ग्रामीण भागात '' आनंदाचा शिधा '' वाटप वेगात ; | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामीण भागात '' आनंदाचा शिधा '' वाटप वेगात ;
ग्रामीण भागात '' आनंदाचा शिधा '' वाटप वेगात ;

ग्रामीण भागात '' आनंदाचा शिधा '' वाटप वेगात ;

sakal_logo
By

01509
बोरवडे : स्वस्त धान्य दुकानांमधून शासनाचा''आनंदाचा शिधा ''वाटप करण्यात येत आहे.
----------

ग्रामीण भागात ‘आनंदाचा शिधा’ वाटप
बिद्री : राज्य शासनाच्या वतीने ‘आनंदाचा शिधा’ वाटपास सुरुवात झाली. शंभर रुपयांत मिळणाऱ्या प्रत्येकी एक किलो साखर, रवा, हरभराडाळ व पामतेल वाटप सुरु आहे. अंत्योदय व दारिद्रयरेषेखालील (बीपीएल) कार्डधारकांना शिधा ऑफलाईन मिळत आहे. वास्तविक हा शिधा दिवाळीपूर्वी मिळणे आवश्यक होते. दिवाळीनंतर त्याचे वाटप सुरु झाले आहे. कार्डधारकांनी शिधा चांगल्या दर्जाच्या असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. ग्रामीण भागात शिधा मिळवण्यासाठी लाभार्थ्यांची सकाळपासूनच स्वस्त धान्य दुकानांसमोर गर्दी होत आहे.