बिद्रीच्या सरपंचपदी पांडुरंग ज्ञानू चौगले यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिद्रीच्या सरपंचपदी पांडुरंग ज्ञानू चौगले यांची निवड
बिद्रीच्या सरपंचपदी पांडुरंग ज्ञानू चौगले यांची निवड

बिद्रीच्या सरपंचपदी पांडुरंग ज्ञानू चौगले यांची निवड

sakal_logo
By

01540
बिद्री सरपंचपदी पांडुरंग चौगले यांची निवड
बिद्री ता. २४ : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पांडुरंग ज्ञानू चौगले यांची निवड झाली. सरपंच आनंदी पाटील यांनी राजीनामा दिल्याने पद रिक्त होते. सरपंचपदासाठी पांडुरंग चौगले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सर्वानुमते निवड झाली. निवडीनंतर मावळत्या सरपंच आनंदी पाटील यांच्या हस्ते नूतन सरपंच श्री. चौगले यांचा सत्कार झाला. सरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा बोलाविली होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बिद्रीचे मंडल अधिकारी महादेव व्हरकट यांनी काम पाहिले. यावेळी माजी सभापती जयदीप पोवार, माजी पं. स. सदस्य नंदू पाटील, पांडुरंगतात्या पाटील, भाऊसो पाटील, शिवाजी पाटील, चंद्रकात पाटील, संदेश पाटील, इंद्रजित पाटील, संतोष ढवण, राजू चौगले, शहाजी गायकवाड, विश्वास पोवार, रमेश ढवण, तानाजी पाटील, सुरेश चौगले, संजय पाटील, आप्पासो पाटील, यशवंत गुरव, तलाठी नीलम दळवी, ग्रामविकास अधिकारी विष्णू पाटील उपस्थित होते.