दूधसाखर महाविद्यालयात ग्रामीण पत्रकारिता व जनसंवाद अभ्यासक्रमाचे उदघाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दूधसाखर महाविद्यालयात ग्रामीण पत्रकारिता व जनसंवाद अभ्यासक्रमाचे उदघाटन
दूधसाखर महाविद्यालयात ग्रामीण पत्रकारिता व जनसंवाद अभ्यासक्रमाचे उदघाटन

दूधसाखर महाविद्यालयात ग्रामीण पत्रकारिता व जनसंवाद अभ्यासक्रमाचे उदघाटन

sakal_logo
By

01560
बिद्री : अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना प्रा. डॉ. होडगे, शेजारी प्राचार्य डॉ. पाटील, भैरवनाथ डवरी आदी.


बिद्रीमध्ये ग्रामीण पत्रकारिता
व जनसंवाद अभ्यासक्रम

बिद्री : पत्रकारिता करिअरसाठी उत्तम पर्याय आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी गांभीर्याने विचार करुन ग्रामीण पत्रकारिता अभ्यासक्रम अभ्यासावा, असे मत सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. शिवाजी होडगे यांनी व्यक्त केले. बिद्री (ता. कागल) दूधसाखर महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ मान्यताप्राप्त आणि मराठी विभाग आयोजित ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवाद अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय पाटील होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक भैरवनाथ डवरी यांनी साहित्य आणि पत्रकारितेवर मार्गदर्शन केले. टी. एम. सरदेसाई यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला डॉ. एस. ए. साळोखे, डॉ. एन. डी. पाटील, डॉ. सी. वाय. जाधव, डॉ. एल. एस. करपे, प्रा. ए. बी. माने, प्रा. सुहानी पाटील, एस. के. पाटील, बाबासो पोवारसह प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. समन्वयक प्रा. डॉ. प्रदीप कांबळे यांनी स्वागत, प्राची चौगले हिने सूत्रसंचालन तर आभार शिवानी पाटील यांनी मानले.