
विषारी औषध प्राशन केलेल्या उंदरवाडीतील १३ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू
1626
...
विषारी द्रव प्राशन केलेल्या
उंदरवाडीतील शाळकरी मुलाचा मृत्यू
बिद्री ता. १० : उंदरवाडी (ता. कागल) येथील ऋग्वेद मधुकर पाटील या १३ वर्षीय शाळकरी मुलाचा विषारी द्रव प्राशन केल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्यावर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात मागील चार दिवसांपासून उपचार सुरू होते. अखेर आज शुक्रवारी रात्री त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी, चार दिवसांपूर्वी ऋग्वेदने राहत्या घरी विषारी द्रव प्राशन केल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला. गावच्या प्राथमिक शाळेत सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या ऋग्वेदच्या मृत्यूने त्याच्या नातेवाईकांना आणि वर्गमित्रांसह ग्रामस्थांनाही मोठा धक्का बसला आहे. त्याचे वडील शेतीकाम करतात तर आई घरकाम करते. ऋग्वेदला मोठा भाऊ असून तो दहावीत शिकतो. रात्री उशिरा उंदरवाडी येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.