
शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम दूध साखर बँकेने केले आहे.
01646
नरेंद्र पाटील यांचा सत्कार
बिद्री : ‘नोकरदार, कामगार, शेतमजूर, सभासद शेतकऱ्यांना अडचणीत सहकार्य करून पाठबळ देण्याचे काम दूध साखर नागरी सहकारी बँकेने केले’ असे प्रतिपादन अण्णासाहेब विकास महामंडळाचे अध्यक्ष, माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी केले. दूधसाखर परिवारातर्फे आयोजित सत्कारावेळी ते बोलत होते. माजी जि. प. सदस्य भूषण पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. भूषणदादा पाटील म्हणाले, ‘बिद्री कारखान्याचे माजी चेअरमन कै. हिंदुराव पाटील यांना अभिप्रेत कामकाज बँकेच्या सातही शाखांमध्ये सुरू आहे.’ सूत्रसंचालन एम. एम.चौगले, स्वागत व प्रास्ताविक बाळासाहेब ढगे यांनी केले. मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक, रोहित डाफळे, निवास घाडगे, टी. के. किल्लेदार, जगदीश चौगले, शाखाधिकारी एम. एम. कोंडेकर, कोल्हापूरचे शाखाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.