बिद्री ''च्या बिनविरोध निवडणूकीची शक्यता धूसर

बिद्री ''च्या बिनविरोध निवडणूकीची शक्यता धूसर

‘बिद्री’च्या बिनविरोध निवडणुकीची
शक्यता धूसर :खा. मंडलिक

बिद्री ता. १९ : साखर कारखानदारीसमोरील अडचणी पाहता ‘बिद्री’सह अन्य कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशी आपलीही इच्छा आहे. परंतु ‘बिद्री’च्या सत्तर हजार सभासद व कार्यकर्त्यांना बिनविरोधसाठी एकत्र आणणे अशक्यप्राय आहे. यापूर्वीचा अनुभव पाहता ‘बिद्री’चा सत्तासंघर्ष अटळ असून बिनविरोध निवडणुकीची शक्यता धूसर असल्याचे प्रतिपादन खासदार संजय मंडलिक यांनी केले.
बिद्री (ता. कागल) येथे कार्यक्रमप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. गेल्या आठवड्यात माजी कामगारांच्या स्नेहमेळाव्यात अध्यक्ष के.पी.पाटील यांनी निवडणूक बिनविरोधसाठी पुढाकार घेण्यास तयार असल्याचे सांगितले होते. याबाबत भूमिका स्पष्ट करताना खासदार मंडलिक यांनी बिनविरोधची शक्यता फेटाळली. विद्यमान संचालक ए. वाय. पाटील यांनी, मी अजूनही सत्ताधारी गटात आहे. निवडणूक बिनविरोध होत असल्यास हरकत नाही. परंतू इतिहास पाहता उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या क्षणी पॅनेलची घोषणा होते. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यास दोन महिन्यांचा अवधी असून काहीही सांगता येत नाही.’ यावेळी माजी जि.प. सदस्य भूषण पाटील, माजी उपसरपंच भरत पाटील, भाजपाचे ग्रामीण उपाध्यक्ष अभिषेक पाटील उपस्थित होते.

चौकट करणे :
खा. मंडलिकांसोबतची मैत्री राजकारणापलीकडे
खासदार संजय मंडलिक व माझा पक्ष वेगवेगळा असले तरी विकासकामांसाठी मी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अन्य मंत्र्यांनाही भेटतो. सध्या मी राष्ट्रवादीतच असून पक्षाचे काम एकनिष्ठेने करत आहे ;असे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले. भविष्यात आम्ही एकत्र यावे असे काहींना वाटत असेल तर जरुर एकत्र येऊ; असा उपरोधिक टोला त्यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com