Thur, Sept 21, 2023

सुभाष चौगुले यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार प्रदान
सुभाष चौगुले यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार प्रदान
Published on : 11 May 2023, 2:58 am
01728
सुभाष चौगुले ‘गुणवंत कर्मचारी’
बिद्री : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे पासिंग ऑफिसर सुभाष गणपती चौगुले यांना बँकेतर्फे ‘गुणवंत कर्मचारी पुरस्कार'' प्रदान करण्यात आला. विद्यमान अध्यक्ष सुनील एडके, उपाध्यक्ष शिवाजी बोलके यांच्या हस्ते श्री. चौगुले यांना गौरविले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुमार मगदूम, पद्मजा मेढे, बाळासाहेब निंबाळकर, सुरेश कोळी, एस. व्ही. पाटील, सुकाणू समितीचे जोतीराम पाटील, सुनील पाटील, सुकाणू समितीचे पदाधिकारी तसेच कर्मचारी, शिक्षक सभासद उपस्थित होते. चौगुलेंना पत्नी माजी जि.प. सदस्या वैजयंती चौगुले, शंकरराव चौगुले, संचालक मंडळ, शिक्षक सभासदांचे सहकार्य लाभते.