बोरवडेत उष्माघाताने तीन जनावरे दगावली

बोरवडेत उष्माघाताने तीन जनावरे दगावली

बोरवडेत उष्माघाताने तीन जनावरे दगावली
बिद्री, ता. १२ : उष्माघात होऊन बोरवडे (ता. कागल) येथे तीन रेड्या दगावल्याची घटना घडली. गावातील नामदेव भोईटे यांच्या मालकीची जनावरे असून हरियाणा जातीच्या अडीच ते तीन वर्षे वयाच्या या रेड्या आहेत.यामुळे त्यांचे दीड लाखांचे नुकसान झाले.
याबाबत माहिती अशी की, नामदेव भोईटे यांचा बोरवडे-उंदरवाडी मुख्य रस्त्यावर शेतामध्ये जनावरांचा गोठा आहे. यामध्ये दुभती जनावरे आणि अन्य लहान रेड्या आहेत. सकाळी धारा काढून या जनावरांना वैरण घालून भोईटे हे घरी आले होते. दुपारी एकच्या सुमारास ते गोठ्यात गेले असता त्यांना अडीच ते तीन वर्षे वयाच्या तीन रेड्या निपचित पडलेल्या दिसल्या. मृत तिन्ही रेड्या हरियाणा जातीच्या असून त्यांची बाजारभावाप्रमाणे किंमत दीड लाख रुपये होते. या घटनेमुळे नामदेव भोईटे यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

कोटर
‘उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णतेचे प्रमाण वाढल्याने उष्माघाताच्या घटना घडतात. या दिवसांत दुधाळ जनावरांची काळजी घ्यावी. त्यांना दिवसातून दोन ते तीन वेळा थंड पाण्याने धुवावे. गोठ्याची दारे, खिडक्या उघड्या ठेवाव्यात. शक्य झाल्यास गोठ्यात फॅनची व्यवस्था करावी. जनावरांना पिण्यासाठी थंडगार पाणी द्यावे. गोठ्यावरील पत्रे, कौलावर नारळीच्या झावळ्या टाकून ते तापणार नाहीत याची काळजी घ्यावी.
- डॉ. दीपक घानवट, पशुधन विकास अधिकारी, कागल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com