बिद्री साखर कारखान्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिद्री साखर कारखान्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
बिद्री साखर कारखान्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

बिद्री साखर कारखान्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

sakal_logo
By

‘बिद्री’ कारखाना फाईल फोटो
...

‘बिद्री’ची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

निवडणूक जाहीर होण्याचा मार्ग मोकळा

बिद्री ता.१७: बिद्री (ता.कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सभासदांची अंतिम (पक्की) मतदारयादी साखर सहसंचालक ए. व्ही. गाडे यांनी आज प्रसिद्ध केली. तर कारखाना कार्यस्थळावर कार्यकारी संचालक के. एस.चौगले, सेक्रेटरी एस.जी.किल्लेदार, बी.बी.पाटील, राजेंद्र चौगले, नारायण पाटील यांच्या उपस्थितीत ही यादी प्रसिद्ध करण्यात आली.
या निवडणुकीसाठी ''अ'' वर्ग उत्पादक सभासद गटातून ५५ हजार ६५ मतदार पात्र ठरले आहेत. तर ''ब'' वर्ग संस्था गटातून १०२२ आणि ४ व्यक्ती असे एकूण १०२६ मतदार पात्र ठरले आहेत. कारखान्याची पक्की मतदार यादी जाहीर झाल्याने आता निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत १० ऑक्टोबर २०२२ रोजी संपली आहे. कारखान्याचे एकूण ६१ हजार ३८४ सभासद आहेत. यापैकी ६३१९ मयत सभासद वगळून ५५ हजार ६५ सभासदांची पक्की मतदार यादी निश्चित करण्यात आली आहे. यासाठी ३१ जानेवारी २०२१ ही अ वर्ग सभासदांसाठी तर ३१ जानेवारी २०२० ही ब वर्ग संस्थासाठी अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला आहे.
...

गटवार मतदार पात्र संख्या

गट क्रमांक १ः ९११०, गट क्रमांक २ ः ८०९६, गट क्रमांक ३ ः ८०८७, गट क्रमांक ४ः ७०७५, गट क्रमांक ५ः १२,०५५, गट क्रमांक ६ः ७१९४, गट क्रमांक ७ ः ३४४८.
....

‘बिद्री साखर कारखान्याच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ५५,०६५ सभासदांची ''अ'' वर्ग तर १०२२ संस्था व ४ व्यक्ती सभासदांची ''ब'' वर्ग यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी सभासदांना पाहण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.’

के.एस.चौगले,
कार्यकारी संचालक, बिद्री साखर कारखाना