सर्पमित्राकडून घोणससह
७३ पिल्लांना जीवदान

सर्पमित्राकडून घोणससह ७३ पिल्लांना जीवदान

01786
बिद्री (ता. कागल) : येथील सर्पमित्र सयाजी चौगले यांनी पकडलेल्या घोणसची पिले.

सर्पमित्राकडून घोणससह
७३ पिलांना जीवदान
बिद्री, ता. ८ : येथील सर्पमित्र सयाजी चौगले यांनी घोणस आणि तिच्या ६३ पिलांना जीवदान दिले. विशेष म्हणजे सयाजी यांनी पकडलेली घोणस जंगलात सोडत असताना ती प्रसूत होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी घोणसला घरी आणून तिची व पिलांची काळजी घेऊन मग जंगलात सोडले.
कुर येथील बाजीराव कुंडलिक मिसाळ यांना राहत्या घरी साप दिसल्याने त्यांनी सयाजी चौगले यांना दूरध्वनीवरून कल्पना दिली. सयाजी यांनी हा साप पकडला असता तो घोणस जातीचा मादी साप असल्याचे दिसून आले. त्यांनी या मादी सापाला पोत्यात बंद करून कात्यायनी जंगलात सोडण्यास नेले असता ती प्रसूत होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. परंतु, तोपर्यंत १० पिली जंगलात गेली; तर उष्माघाताने तीन पिलांचा मृत्यू झाला.
त्यांनी या घोणस सापाला परत पोत्यात घालून घरी आणले; तोपर्यंत तिने आणखी ६३ पिलांना जन्म दिला होता. या पिलांचा व्यवस्थितपणे जन्म झाल्यावर सयाजी चौगलेंनी घोणस व तिच्या ६३ पिलांना सायंकाळी थंड वातावरणात कात्यायनी जंगल परिसरात सोडून दिले. त्यांच्या या तत्परतेमुळे घोणस व पिलांचा जीव वाचला.
--------------
चौकट
सर्पमित्र सयाजी यांची तत्परता
सयाजी यांनी हा घोणस वेळीच पकडला नसता, तर तिची पिली राहत्या घराच्या परिसरात पसरली असती. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना धोका तर झाला असता. मागील १५ वर्षांत सयाजी यांनी शेकडो सापांना जीवदान दिले आहे.
---------------
कोट
वास्तविक घोणस जातीच्या सापांचा नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा प्रजननाचा काळ असतो. परंतु, बदलत्या वातावरणामुळे क्वचित प्रसंगी अवेळीही प्रजनन होऊ शकते. पकडलेल्या मादी आणि पिलांना सुरक्षितपणे जंगलात सोडून दिले आहे.
- सयाजी चौगले, सर्पमित्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com