टुडे ४ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे ४
टुडे ४

टुडे ४

sakal_logo
By

00835
माणगाव : आकुर्ळे रस्त्यावर असे जागोजागी खड्डे पडून रस्त्याची मोठया प्रमाणात दुरवस्था झाली आहे.

माणगाव-आकुर्ळे रस्ता खड्ड्यात
--
पावसाने दूरवस्था ; ग्रामस्थांची दुरुस्तीची मागणी

भेडसगाव, ता. १८ : शाहूवाडी तालुक्यातील माणगाव ते आकुर्ळे या दोन किलोमीटरच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, रस्त्याची दूरवस्था झाली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन खड्डे बुजवावेत, अशी मागणी आकुर्ळे ग्रामस्थांनी केली आहे.
बांबवडे -कोकरूड या मुख्य मार्गावरील माणगावातून दोन किलोमीटर असलेला आकुर्ळे रस्ता नादुरुस्त झाला आहे. गावातील लोकांना ये-जा करण्यासाठी एकमेव रस्ता असून रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अरुंद असलेल्या या रस्त्यावर दोन-तीन ठिकाणी मोऱ्या असून त्याच्या बाजूपट्ट्या खचल्या आहेत. गावात दवाखाना, महाविद्यालय नसल्यामुळे विद्यार्थी, ग्रामस्थ, गर्भवती महिला, रुग्ण, तसेच वयस्कर लोकांना वाहतूक करताना अडचणी येत आहेत. वाहन चालवताना कसरतच करावी लागते. गावात सुखसुविधा, अत्यावश्यक सेवा नसल्याने बांबवडे, कोल्हापूर, कोकरूड यासारख्या मुख्य बाजारपेठेत सतत ये -जा करावी लागते.
खड्ड्यांमुळे विद्यार्थी, रुग्ण, ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. आकुर्ळे गाव मुख्य रस्त्यापासून दोन-तीन किलोमीटर आत असल्याने एसटीची सोय नाही, परिणामी दुचाकी किंवा खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. याबाबत अनेकदा लोकप्रतिनिधी, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार झाला असून, यांनीही दुर्लक्ष केल्याने या रस्त्यावरील खड्डे कोणीही बुजवलेले नाहीत. पावसाचे पाणी खड्ड्यात साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने हे खड्डे अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत.

कोट
माणगाव-आकुर्ळे रस्ता पूर्णपणे उखडला असून दूरवस्था झाली आहे. विद्यार्थी, वयस्कर लोक, रुग्णांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. लोकप्रतिनिधी, संबंधित विभागाकडे अनेकदा पाठपुरावा केला आहे. परंतु, कोणालाही पर्वा नाही. तत्काळ खड्डे बुजवावेत; अन्यथा आंदोलन करू.
- राणी कुंभार, सरपंच, आकुर्ळे

Web Title: Todays Latest Marathi News Bds22b00703 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..