नळपाणी योजना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नळपाणी योजना
नळपाणी योजना

नळपाणी योजना

sakal_logo
By

अमेणी नळपाणी योजनेसाठी एक कोटी
भेडसगाव, ता. ३१ : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या जलजीवन योजनेंतर्गत अमेणी (ता. शाहूवाडी) येथील नवीन नळपाणी पुरवठा योजनेसाठी ६५ लाख व अमेणीपैकी खोंगेवाडी येथील नळपाणी पुरवठा योजनेसाठी ३५ लाख असा एकूण एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती सरपंच संजय पाटील यांनी दिली.
जिल्हा परिषद सदस्य हंबीरराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून व माजी सरपंच भगवान पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याने हा निधी मंजूर झाला असल्याचेही सरपंच पाटील यांनी यावेळी सांगितले. उन्हाळ्यात या गावांना पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत होता. परंतु या योजनेमुळे हा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. यावेळी उपसरपंच उषाताई नायकवडी, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.