
माणगाव
00904
माणगाव : येथील ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर.
...
माणगावात उद्या सिद्धेश्वर मंदिराचा वर्धापनदिन
भेडसगाव : माणगाव (ता. शाहूवाडी) येथे यात्रा- जत्रेला फाटा देऊन येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिराचा वर्धापनदिन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी १६ मे रोजी साजरा केला जाणार असल्याची माहिती येथील ग्रामस्थांतर्फे देण्यात आली. यावर्षी १३ वा वर्धापनदिन असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कबड्डी स्पर्धा, श्वान स्पर्धा, रेकॉर्ड डान्स स्पर्धा, बैलगाडी स्पर्धा तसेच महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित केला आहे. यावर्षी एका नवीन उपक्रमाला सुरुवात होत असून, यामध्ये गावातील ज्या नागरिकांनी ७५ वर्षे पूर्ण केली आहेत, अशा नागरिकांचा आंब्याचे रोप देवून सत्कार केला जाणार आहे. वृक्ष चळवळीस प्राधान्य देणे गरजेचे असल्यामुळे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यावेळी महाप्रसादाचेही आयोजन केले असून, माणगावमधील सर्व ग्रामस्थ, तसेच नोकरी, व्यवसायानिमित्त परगावी असणारे सर्व ग्रामस्थ या कार्यक्रमांमध्ये एकदिलाने सहभागी होत असतात. या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.