केर्लीतील गायरानातील अतिक्रमणे कायम करा . अतिक्रमणधारकांची बैठकीत मागणी . | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केर्लीतील गायरानातील अतिक्रमणे कायम करा . अतिक्रमणधारकांची बैठकीत मागणी .
केर्लीतील गायरानातील अतिक्रमणे कायम करा . अतिक्रमणधारकांची बैठकीत मागणी .

केर्लीतील गायरानातील अतिक्रमणे कायम करा . अतिक्रमणधारकांची बैठकीत मागणी .

sakal_logo
By

01098

केर्लीत सर्वपक्षीयांची बैठक
भुये, ता.१० : केर्ली ( ता. करवीर) येथील अतिक्रमणे कायम करावी या मागणीसाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची मंगळवारी हनुमान मंदिरात बैठक झाली. या मागणीचा विचार शासनाने गांभीर्याने करावा, अन्यथा सर्वोच कोर्टात याचिका दाखल करूच, पण यापुढे आत्मदहनासारखे आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला. दरम्यान, सोमवारी आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके यांन भेटून निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार असल्याने यावेळी सांगण्यात आले. शासनाने गावागावांतील अतिक्रमणाविरोधात कायदा केला आहे. त्या विरोधात प्रत्येक गावातून उद्रेकाचा भडका उडत आहे. पूर्वी लहान गावे होती. आता प्रत्येक कुटूंबात एकाची दहा कुटुंबे झाली आहेत. त्यामुळे जागा मिळेल तिथे प्रत्येकाने सुरुवातीला साधे घर, नंतर पक्के घर व आता बंगल्याची बांधकामे केली आहेत. गावागावांत शासनाच्या विरोधात सर्वपक्षीय लोक एकत्र येऊ लागले आहेत.