Wed, June 7, 2023

निगवे दुमाला सरपंचपदी कोमल जासूद बिनविरोध
निगवे दुमाला सरपंचपदी कोमल जासूद बिनविरोध
Published on : 16 March 2023, 5:21 am
01199
निगवे दुमाला सरपंचपदी कोमल जासूद
भुये : निगवे दुमाला (ता. करवीर) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कोमल सुशांत जासूद यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी मंडल अधिकारी विलास तोडकर होते. मावळत्या सरपंच योजना किडगावकर यांनी राजीनामा दिला. रिक्त झालेल्या जागेवर सर्वानुमते कोमल जासूद यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी सुकाणू कमिटीचे सदस्य सुरेश पाटील, डॉ. एम. बी. किडगावकर, प्रकाश पाटील, बत्तास एकशिंगे, बत्तास चौगले, अनिल चोपडे, दिलीप यादव, सर्जेराव पाटील, सागर किडगावकर, राजाराम कासार, संजय एकशिंगे, निवास कुर्ले, संजय पाटील, निवास पाटील, रणजीत पाटील, उपसरपंच सुरज एकशिंगे, ग्रा.पं. सदस्य व सदस्या उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी संजय शिंदे यांनी आभार मानले.