पान ३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ३
पान ३

पान ३

sakal_logo
By

01328

बाजार भोगाव पैकी मौताईवाडी : येथे गव्याच्या भीतीने झाडावर चढलेला तरुण.

गव्यांच्या भीतीने तरुण
अडकला तासभर झाडावर

बाजार भोगाव, ता. १४ : काल रात्री शेतात आलेले गवे डोंगरात न परतल्यामुळे पहाटे वैरणीसाठी गेलेल्या युवकाला जीव वाचवण्यासाठी सुमारे तासभर झाडावर चढून बसावे लागले. त्याने आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थ व वन कर्मचाऱ्यांनी दीड-दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर गव्यांना डोंगराच्या दिशेने पिटाळून लावले.
ही थरारक घटना आज सकाळी साडेसहा ते नऊच्या दरम्यान घडली. माहिती अशी, बाजार भोगाव पैकी मौताईवाडी येथील रोहित कुळवे, दत्ता कुळवे यांच्यासह काही ग्रामस्थ आज पहाटे वैरणीसाठी नदीकाठावरील मळा नावाच्या शेतात गेले होते. वैरण कापत असताना रोहितला समोरच तीन गवे दिसले. भीतीने त्याची बोबडी वळली. प्रसंगावधान राखत तो जवळच्याच झाडावर चढला. सुरुवातीला आरडाओरडा करत त्याने गवा यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. तथापि, दळवे जागचे हलले नाहीत. त्यानंतर त्याने झाडावरूनच गावकऱ्यांना साद घालायला सुरुवात केली. सुमारे तासभर आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थ व वन कर्मचारी संबंधित शेतात आले. अथक प्रयत्न करून त्यांनी दव यांना भणगे मळामार्गे डोंगराच्या दिशेने पिटाळून लावले. झाडावर अडकलेल्या रोहित कुळवे याला खाली उतरवून घेतले.

Web Title: Todays Latest Marathi News Bjb22b01010 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top